भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.!
![भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन.!](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_670652e4ed7bc.jpg)
प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया
भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
सडक अर्जुनी : खासदार डॉ. प्रशांत जी पडोळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आणि अध्यक्षस्थानी अभिजीत दादा वंजारी साहेब होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भाऊ दहिवले यांनी केली व कार्यक्रमाची पार्श्वभूमी नूतनताई दहिवले यांनी सांगितली. रोजगार मेळाव्याला बेरोजगार युवांनी एकूण १७८४ नोंद केली त्यापैकी १५१ युवक व युवतींना तात्काळ त्यादिवशी नोकरीच्या नियुक्तीपत्र कंपन्यांकडून देण्यात आले. उर्वरित पात्र युवक युवतींना कंपनीकडून कॉल लेटर देण्यात आले. रोजगार मेळाव्याला खासदार डॉक्टर प्रशांतभाऊ पडोळे साहेब आणि आमदार अभिजीत दादा वंजारी यांनी युवक युवतींना व पुरुष व्यक्तींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे शेवट म्हणजे आभार प्रदर्शन निशांत राऊत यांनी केले. आयोजक अनिल भाऊ दहिवले आणि नूतन ताई दहिवले यांनी कार्यक्रमाला उपस्थितीत असलेले युवक युवती महिला व पुरुष यांचे धन्यवाद मानले.