वंचित समुहाला न्याय देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत द्या; नरसिंग उदगीरकर यांचे आहवान...

वंचित समुहाला न्याय देणाऱ्या  पक्षाच्या उमेदवाराला मत द्या;  नरसिंग उदगीरकर यांचे आहवान...

NEWS15 मराठी प्रतिनिधि : असलम शेख, लातूर

जनसामान्यांचा पक्ष म्हणजे; श्रेध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्ष असून, वंचित समुहाला न्याय देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मत दया असे आवाहन लातूर राखीव मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी लोकसभेचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी मतदारांना केले आहे.

मातबर पक्षाचे मातबर उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूकीत उभे आहेत.! पण जनसामान्यांना न्याय देण्यासाठी वंचित घटकांचा पक्ष म्हणजे श्रेद्धय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाची भूमिका म्हणजे संसदेमध्ये समान घटकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्व घटक समान असले पाहिजे या न्यायिक भावनेने मातंग समाजातील उच्च विध्याविभुषीत ज्यांना प्रशासनाचा तिस वर्षांचा अनुभव जे प्रमाणिक निर्भिड आणि उत्तम प्रशासक गरीबाची जाण असलेली व्यक्ती संसदेत गेली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय इतर सर्व पक्ष प्रस्तापितांचे आहेत त्यात कॉग्रेस घराणेशाहीचा भाजप भांडवलंदार वर्ग आणि ईडी' सिबीआय ' एसीबी चा पक्ष आहे देशात एकच पक्ष असा आहे की बहुजनांचा तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रेध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष वंचित बहुजन आघाडी कारण हा पक्ष दिन दुबळे गरीब जनतेसाठी स्थापन केला आहे तेंव्हा मतदारांनी मातंग समाज बांधव,कार्यकर्ते,अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महिला, जानकार व्यक्तीने गांभिर्याने विचार करून सर्व  समाजाला न्याय देणारे श्रेध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करावे असे आवाहन नरसिंग उदगीरकर यांनी केले आहे.