विकासाच्या नावावर निवडणूक लढवणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

विकासाच्या नावावर निवडणूक लढवणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, आर्णी

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या मेळावा संपन्न झाला. या कार्यकर्त्या मेळाव्याला आमदार मदन येरावार, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार अशोक उईके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वनी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी हे तालुके येत असल्यामुळे; आज दि. 28 मार्च रोजी आर्णी येथील तीर्थरूप मंगल कार्यालय येथे आले असता: सुधीर मुनगंटीवार यांनी म्हंटले की, मी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून, मागील काळात केलेल्या विकासाची यादीच वाचून दाखवली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुनगंटीवारांना पसंती देऊन दोन लाख मताच्या वर निवडून येण्याची शाश्वता दिली.