हॅग्जागॉन कंपनीचे काम बंद करा : मा. सरपंच ज्योती देशमुख

हॅग्जागॉन कंपनीचे काम बंद करा : मा. सरपंच ज्योती देशमुख

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक / दिंडोरी : लखमापूर येथील गट क्र.९२ व ४४७ त्या मिळकती हॅग्जागॉन कंपनीने विकत घेतल्या असून, सदर कंपनीने गट क्र.९२ ह्या मिळकतीचे कुठल्याही प्रकारची अकृषिक परवानगी घेतलेली नाही. २५ ते ३०  वर्षापासुन सदर जागेवर अनाधिकृत बांधकाम करत कंपनी चालू असल्याने, ते तत्काळ बंद करण्याची मागणी माजी सरपंच ज्योती देशमुख यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकार्‍यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लखमापूर येथील हॅग्जागॉन कंपनीने गट क्र. ४४७ वर सध्या बांधकाम चालु आहे. त्याची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. गट क्र.९२  ला ग्रामपंचायत अथवा नगररचना यांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही. या कंपनीला कुठलीही अधिकृत प्लॅन मंजुरी नाही. त्यामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना घडु शकते. याची गंभीर दखल देऊन चौकशी करावी तसेच सदर जागेवरचे शेकडो झाडे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता तोडलेली आहेत. या सर्व बाबींची चौकशी होणे गरजचे व महत्वाचे आहे. संबधीत कंपनीकडून गावाला अद्याप सी.एस.आर.निधीमधून कोणाताही विकासत्मक काम केले नाही. परंतु कंपनी कायद्याप्रमाणे स्थानिक ग्रामपंचायतीला कोणताही सामाजिक, विधायक लाभ देत नाही. तसेच कंपनीने आज पर्यंत स्थानिक, सुशिक्षीत बेरोजगारांनी कंपनीत सामावून घेतले नाही. त्यांना कायमस्वरुपी नोकरी देखील दिली नाही. किमान वेतन देखील दिेलेले नाही. तसेच संबधीत कंपनीने आज पर्यंत जरी काही बेरोजगार तरुणांना काम दिले असेल ते कमी कालावधीचे तात्पुरत्या स्वरुपाचे दिले व त्यांना कमीकाळातच कामावरुन कमी देखील केले. सदर कंपनीने कंपनीच्याच आजुबाजुला २८ गुंठे क्षेत्राावर अतिक्रमण करून, मन मानेल तसेच वापरात घेतले आहे. संबधीत कंपनी ही फार्मा कंपनी असल्याने तिचे सांडपाणी, केमीकल, धुर, पावडर इत्यादीमुळे प्रदुषन होत आहे. कंपनीचे आजुबाजुचा संपुर्ण परिसर हा शेती वापराचा असल्याने त्याचे दिर्घ कालीन दुष्परिणाम शेतीवर देखील झालेले आहे. याबाबत प्रशासकीय स्तरावरुन चौकशी व्हावी व संबधीत कंपनी अधिकृत किंवा अनाधिकृत याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ज्योती देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

जीवीतास धोका ?

संबधीत कंपनीविरोधात तक्रार करीत असल्याने सदर कंपनी प्रशासन व कंपनी मालकाकडून माझे व माझे कुटुंबियांच्या जिवीतास धोका असल्याची भिती सुद्धा व्यक्त करत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे ज्योती देशमुख यांनी म्हंटले आहे.