अश्लेष माडे यांचा राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश...

अश्लेष माडे यांचा राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक-अर्जुनी 

सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील पत्रकार, कवी अश्लेष माडे यांनी पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या हस्ते मनसेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन, अश्लेष माडे यांनी मनसेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कार्यालयात जाऊन त्यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून दि.31 आगस्ट रोजी मनसेत प्रवेश केला आहे.

यावेळी अश्लेष माडे यांनी राजूभाऊ उंबरकर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली व तालुक्यातील समस्या सोडवण्याची मागणी केली. यावेळी राजूभाऊ उंबरकर यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन केले. तसेच पक्षातील पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.