शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्याकडून अधिकार्‍यांना 15 कोटी वसुलीचे टार्गेट.! विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तर हायकोर्टाकडूनही ताशेरे

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्याकडून अधिकार्‍यांना 15 कोटी वसुलीचे टार्गेट.! विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तर हायकोर्टाकडूनही ताशेरे

NEWS15 प्रतिनिधी : नागपूर

जमीन घोटळ्यावरून राज्याच्या हिवाळी अधिवेशानाचा पहिला आठवडा संपला असता; अधिवेशनातील दुसरा आठवडाही वादळी ठरतांना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सरकार आणि विरोधक यांच्यात प्रचंड सामना पाहायला मिळाला. तर अनेक आरोप/प्रत्यारोप देखील करण्यात आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत; गंभीर आरोप केले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

 विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप.! 

कृषी मंत्रालयाकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांचे टार्गेट दिले असून, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होणाऱ्या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या महोत्सवासाठी १५ कोटीचे टार्गेट दिल्याची माहिती आज विधानसभेत विरोधकांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, "सिल्लोड महोत्सवासाठी आयोजकांनी वेगवेगळ्या रक्कमेचे कूपन काढले आहेत. ते कूपन विकण्याचे किंवा खपवण्याचे काम राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं आहे. १० पेक्षा जास्त तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे आणि १० पेक्षा कमी तालुके असणाऱ्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना वेगळे टार्गेट देण्यात आलंय. कूपनमध्येही वेगवेगळ्या कॅटॅगरी आहेत. कृषी दुकानांकडूनही काही बेकायदेशीर रक्कमेची मागणी होत आहे. हे लोकशाहीला धक्का देणारं कृत्य आहे. हे सगळ्या नियमांची पायमल्ली करत असतात. त्यामुळे आम्ही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत" असं विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

नागपूर खंडपीठाने अब्दुल सत्तार महसुल राज्यमंत्री असतांना केलेल्या गायरान जमीन वाटपावर देखील नाराजी व्यक्त करत त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. यावर देखील अजित पवार यांनी काही मुद्दे उपस्थितीत केले. नागपूर खंडपीठाने आताच्या कृषीमंत्र्यांविरोधात ताशेरे ओढले आहेत. पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. २९ गुंठे गायरान जमीन वाटपात १५० कोटींचा घोटाळा झाल्याचे कोर्टाने निरीक्षण नोंदवले आहे असं अजित पवार म्हणाले. तर सत्तार यांच्यावर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढत.! सत्तार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या आहेत.