राजकीय : नाणेकरवाडी -महाळुंगे जिल्हा परिषद गटातून अरुण सोमवंशी यांचीही उमेदवारीसाठी दावेदारी...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातून जशी निवडणूक जवळ येत आहे तशी उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहेत. या गटातून आता खराबवाडी गावातील यशस्वी उद्योजक आणि खरबवाडी गावच्या माजी सरपंच योजना सोमवंशी याचे पती खेड खरेदी विक्री संघांचे बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलेले अरुण सोमवंशी यांनी आता या गटात उमेदवारीसाठी आपणही दावेदारी असल्याचे जाहीर केले आहे.

अरुण सोमवंशी यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध त्याचं बरोबर शांत आणि संयमी स्वभावाचा त्यांना फायदा होऊ शकतो. मागील वीस ते पंचवीस वर्षे राजकारणात सक्रिय असल्याने त्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आता जे काही या गटातून उमेदवारीसाठी उमेदवार इच्छुक आहेत त्यांनाही राजकारणात आणण्यात अरुण सोमवंशी यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यातच त्यांचे नातेगोते मोठे असल्याने त्यांची उमेदवारी निर्णायक ठरणार आहे. अरुण सोमवंशी यांचा राजकीय धूर्त पणा बघता ते कोणत्याही क्षणी राजकीय आराखडे जुळवून उमेदवारी करू शकतात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने नानेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटात राजकीय चित्र बदलू शकते असा कयास राजकीय जानकर बोलून दाखवत आहेत. त्यांनी आता अतिशय मायक्रो पद्धतीने प्रचार सुरु केला आहे. गटातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे..
अरुण सोमवंशी यांच्या पत्नी योजना सोमवंशी यांनी खराबवाडी गावचे पाच वर्षे सरपंच पद भूषवून सर्वाधिक विकासात्मक कामे केल्याची चर्चा अजूनही गावात होत असते. त्यातच सोमवंशी परिवार सदैव सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये असणारा परिवार असल्याने त्यांना त्यांच्या या गोष्टीचा राजकीय दृष्ट्या फायदा होऊ शकतो. त्याचं बरोबर अरुण सोमवंशी हे राजकीय गणिते जुळविण्यात माहीर असल्याने ऐनवेळी अरुण सोमवंशी कोणती खेळी करून कोणत्या पक्षाकडून आपले राजकीय नशीब आजमावतात हेच पहावें लागेल..