मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले, मात्र विरोधक जातीय द्वेष परसरवितात - मुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले, मात्र विरोधक जातीय द्वेष परसरवितात - मुख्यमंत्री शिंदे

NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोली येथील रामलिला मैदानावर दि. 10 मार्च रोजी शासन आपल्या दारी हा उपक्रम संपन्न झाला.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर भाष्य करत; मराठा आरक्षण विषयी आपले मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले की; ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले. मात्र काही विरोधक जातीय द्वेष परसरविण्याचे काम करित असून, हे आरक्षण  टिकणारे नाही अशी टिका करत आहेत. आजपर्यंत आरक्षणापासून मराठ्याना वंचित ठेवणाऱ्यांना आता तुम्ही जाब विचारा आणि त्यांच्या अशा अफवाना बळी पडु नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.