दलित वस्तीच्या विकास कामाकडे, जाणून बुजून दुर्लक्ष...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - शिवराज पाटील होनशेटे
नायगाव : तालुक्यातील हुस्सा येथील दलित वस्तीच्या विकास कामात; जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. गावातील काही राजकीय मंडळी विकास कामाआड येत असल्याने, दलित वस्तीतील विकास कामे जैसे थे वैसे राहिल्याचे बोलले जात आहे. तर याचा नाहक त्रास दलित वस्तीतील जनतेला सहन करावा लागत आहे.
प्रामुख्याने दलित वस्तीतील रस्ते, नाली, वीजबत्ती, अस्वच्छता व लघुपाटबंधारे अंतर्गत येणारा कॅनल क्रमांक सात चे अपूर्ण काम असल्याने, त्या कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असल्याचे दिसून येत आहे. दलित वस्तीतील रोडावर चिखलाचे साम्राज्य साचल्याने, रस्त्यावर जात असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सदर दलित वस्तीतील विकासकामे; गावातील काही राजकीय मंडळीकडून जाणून बुजून अडथळे आणून न करण्याचे मनसोबे करत आहेत. मागील ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गावातील दोन गट एकत्र येत ग्रामपंचायतवर सत्ता काबीज केली असता; विकासाच्या बाबतीत मात्र दोन्ही गटाकडून बगल देण्यात येत आहे. मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये दलित वस्तीसाठी एक रुपयाचा देखील निधी आलेला नसून, दलित वस्तीतील विकास कामे मात्र जैसे ते वैसे राहिलेले आहेत. ग्रामपंचायत मधील दोन गटातील राजकीय पुढाऱ्यांच्या मते; मी बडा की तू बडा.! म्हणण्याच्या वादात गावातील विकास कामे मात्र अपूर्ण राहिलेले आहेत. ग्रामपंचायतला आलेला निधी कामाविण तसाच राहिल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील प्रत्येक विकास कामात दोन्ही गटात संगणमत नसल्याने, विद्यमान सरपंच यांना काम करण्यास मोठ्या अडचणी व अडथळे निर्माण होत आहेत. एका गटाकडून छुप्या पद्धतीने गावातील नागरिकास व शासनाच्या अधिकाऱ्यांस हाताशी धरून, गावातील कामात मोठे अडथळे निर्माण करण्याचे षडयंत्र चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.
गावच्या राजकारणात; दलित वस्तीच्या विकासाला गती मिळेल का असे प्रश्न? आता येथील नागरिक करू लागले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स संपूर्ण देशात साजरा होत असताना; देशातील ग्रामीण भागात मात्र विकासाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. किंवा काही राजकीय पुढार्यांच्या मते जाणून बुजून न करण्याचे षडयंत्र रचविले जात आहेत. गावातील विकास कामात राजकारण आल्याने, दलित वस्तीच्या विकासकामाला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दलित वस्तीतील कामे रेंगाळले आहे.