खोडशिवनी ग्रामपंचायत निवडणुकीत आशिष टेंभुरकर यांचा दणदणीत विजय...

खोडशिवनी ग्रामपंचायत निवडणुकीत आशिष टेंभुरकर यांचा दणदणीत विजय...

NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके

गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडशिवनी ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 2 मधून सदस्य पदासाठी आशिष टेंभुरकर हे विजय झाले आहेत. तर ग्रामपंचायत सरपंच पदी गंगाधर परशुरामकर यांची वर्णी लागली.

आशिष टेंभुरकर यांची जिल्ह्यामध्ये विकास पुरुष अशी ख्याती असून, ते उत्कृष्ट पत्रकार सुद्धा होते. तसेच त्यांनी 2005 मध्ये राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सुद्धा प्राप्त केलेला आहे. आशिष टेंभुरकर हे समाजकार्यामध्ये नेहमीच अव्वल असतात.! गावातील नागरिकांना ते वेळोवेळी सहकार्य करत असून, त्यामुळेचं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आशिष टेंभुरकर ह्यांना गावातील नागरिकांनी प्रचंड बहुमतांनी विजयी केले आहे.