प्रा.नारायण पाटील यांचा राष्ट्रवादीला राम राम; तालुका कार्यकारिणीवरून संघर्ष
![प्रा.नारायण पाटील यांचा राष्ट्रवादीला राम राम; तालुका कार्यकारिणीवरून संघर्ष](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66f56874925d4.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निळवंडी येथील कार्यकर्ते प्रा.नारायण पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्याकडे पाठवला असून यानिमित्त पक्षाच्या तालुका कार्यकारणीतील संघर्ष उघड झाला आहे .
आपल्या राजीनामा पत्रात प्रा.पाटील यांनी म्हटले आहे की, आपण पक्षाच्या स्थापनेपासून पक्ष संघटनेत काम करीत असून २००५ मध्ये जिल्हा पातळीवरील राष्ट्रवादी कला क्रीडा मंचाची स्थापना केली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक, राष्ट्रवादी ग्रंथालय,पेठ तालुका निरीक्षक तसेच जिल्हा संघटक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या या माध्यमातून आपण शिबिरे, स्मरणिका, ग्रंथालय चळवळ, व्याख्यानमाला तसेच पक्षाने दिलेली निवडणूक जबाबदारी पार पाडली.सध्या तालुकाध्यक्ष भास्कर भगरे हे खासदार झाल्यामुळे पाटील यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी पक्षातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी केली होती.मात्र तालुका अध्यक्षपदी त्यांची वर्णी न लागल्याने त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.विशेष म्हणजे यासाठी त्यांनी कुणालाही जबाबदार धरलेले नसून आपण स्वतःच कुठेतरी कमी पडलो असेही म्हटले आहे
चौकट;;;;
१) पक्ष संघटनेत काम करणारा कार्यकर्ता भविष्यात आपल्याला कुठेतरी संधी मिळेल अशी आशा बाळगत असतो मागील काळात मी तसेच रघुनाथ पाटील देखील तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक होतो.मात्र सध्या आम्ही नारायण पाटील यांची शिफारस केलेली होती.नारायण पाटील यांनी गेले अनेक वर्ष पक्षांमध्ये ग्रंथ चळवळ,रक्तदान शिबिरे,मॅरेथॉन तसेच व्याख्यानमाला या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले पक्षाने त्यांची दखल घ्यायला हवी होती त्यांच्यावर अन्याय झाला याचे दुःख वाटते.
(गंगाधर निखाडे)
आमचे स्नेही व मार्गदर्शक नारायण पाटील यांनी पक्ष कार्यकारणीत अनेक उपक्रम कार्यक्रम राबवले.एक उपक्रमशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांना परिचित आहेत पक्षाने त्यांना योग्य संधी देणे आवश्यक होते.
( हिरामण गावित,)