किराया थकविल्याचा वाद पेटला.! JCB - ट्रॅक्टर मालकाला फोनवरून धमक्या - अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल...

किराया थकविल्याचा वाद पेटला.! JCB - ट्रॅक्टर मालकाला फोनवरून धमक्या - अड्याळ पोलिसात गुन्हा दाखल...

प्रतिनिधी - नितीन वरगंटीवार, भंडारा

भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील विरली खंदार परिसरात किराया थकविल्याच्या प्रकरणात चांगलाच गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. विरली खंदार येथील नितेश श्रिकृष्ण मोटघरे (32) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्च 2025 मध्ये आपली जेसिबी आणि ट्रॅक्टर मुरुम टाकण्यासाठी बिरली खंदार येथील प्रमोद मारोती मेंढे (38) यांना भाड्याने दिली होती. मात्र तब्बल ₹74,000 ची रक्कम थकीत असून आरोपी सतत “आज देतो, उद्या देतो” असे सांगून पैसे चुकवित होता.

फिर्यादीने वारंवार मागणी करूनही आरोपीने फोन न उचलणे, मेसेजला प्रतिसाद न देणे अशा टाळाटाळीची भूमिका घेतली. अखेर 4 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मोटघरे यांनी पुन्हा पैसे मागितले असता, आरोपीने फोनवरूनच “तुझे पैसे पचवून बसलो काय?” अशी उर्मट शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच “कसा धंदा करतोस?” अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाने चांगलाच वाद पेटल्याने मोटघरे यांनी थेट अड्याळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीवर कलम 352, 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून,पुढील तपास सुरू आहे.