300 ब्रास'ची रॉयल्टी, मात्र उत्खनन केले 700 ब्रास पेक्षा अधिक.! महसूल प्रशासनाची कारवाई...

300 ब्रास'ची रॉयल्टी, मात्र उत्खनन केले 700 ब्रास पेक्षा अधिक.! महसूल प्रशासनाची कारवाई...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके 

लाखांदुर : सध्या रस्ता तसेच कालव्याच्या बांधकामा करिता मुरुमाचे मोठ्या प्रमाणात वापर होत असून, याच संधीचा फायदा घेत संबंधित कंत्राटदार कमी रॉयल्टी घेऊन दुप्पट आणि तिप्पट मुरमाचे अवैद्य खोदकाम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच शासनाचा महसूल बुडवीत असल्याची घटना देखील पुढे येत आहेत.

लाखांदूर तालुक्याच्या पारडी ते मानेगाव या रस्त्यासाठी पारडी येथील एका शेत जमिनीतून मुरमाची 300 ब्रासची रॉयल्टी घेऊन खोदकाम सुरू करण्यात आले. परंतु, संबंधित कंट्राटदाराने यात 700 ब्राश पेक्षा जास्त अवैधरित्या मुरमाचे खोदकाम केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तहसीलदार लाखांदूर यांच्या निदर्शनास आणून देताच नायब तहसीलदार अखिलभरात मेश्राम यांनी धाड टाकून, सदर अवैद्य उत्खनाचा पंचनामा केला. दरम्यान आता किती रुपयाचा दंड आकारला जातो याकडे लक्ष लागला आहे.

लाखांदूर तालुक्यात पारडी मुरमाडी या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधकाम सुरू आहे. अंदाजे दोन कोटी 81 लक्ष रुपये मंजूर असलेल्या या रस्त्यासाठी संबंधित कंत्राटदाराने पारडी तलाठी साज्यातील गट क्रमांक 543 मधील 0.20 हेक्टर आर क्षेत्रातून लाखांदूर तहसील कार्यालयातून 300 ब्रास मुरमाची रॉयल्टी घेतली. तहसील कार्यालयाने 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत 300 ब्रास रॉयल्टी'ची परवानगी दिली. मात्र कंत्राटदारांनी नियमाची पायमल्ली करीत मंजूर रॉयल्टी पेक्षा 700 ब्रास पेक्षा अधिक मुरमाची खोदकाम करून वाहतूक केली आहे. या संदर्भात लाखांदूर तहसीलदारांना माहिती मिळताच 1 फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच पार्टी येथील तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन धाड टाकली असता; JCB मशीनच्या सहाय्याने 5 ते 6 ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक होताना आढळून आले. ज्या जागेतून खोदकाम केले त्याचे मोजमाप केले असता 1 फेब्रुवारी पर्यंत 568 ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याचा पंचनामा करण्यात आला. मात्र सदर कंत्राटदाराने पुन्हा दोन दिवस त्याच ठिकाणावरून मुजोरीने अवैदरीत्या मुरूम खोदल्याने पुन्हा मोजणी केल्यास 700 ब्रास पेक्षा जास्त मुरूम काढण्याची बाब पुढे येऊ शकते. नायब तहसीलदार मेश्राम यांनी संपूर्ण अहवाल तहसीलदार यांच्याकडे सोपविला असून, आता तहसीलदार यावर काय कारवाई करतात याकडे अधिकारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.