चिंचखेड येथे.! उसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे आढळले, शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण...

चिंचखेड येथे.! उसाच्या फडात बिबट्याचे तीन बछडे आढळले,  शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण...

NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे ऊसतोड सुरु असताना; ऊसाच्या फडात तोडणी करणार्‍या कामगारांना बिबट्याची तीन बछडे आढळून आली आहेत. निवृत्ती मातेरे यांच्या शेतात तोड सुरु असताना; तोडकऱ्यांना गुरगुरण्याचा आवाज आला. यावर त्यांनी लक्ष ठेवले असता शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. यामुळे ऊसतोड कामगारांमध्ये व्यक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी लगेचच ऊसतोड बंद करत शेतकरी निवृत्ती मातेरे यांना याबाबत कळवले.

त्यानंतर निवृत्ती मातेरे यांच्यासह चिंचखेड येथील वन्यजीव रक्षक जीवा सताळे, किरण कांबळे यांनी तात्काळ वनी येथील वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. बिबट्या ही याच परिसरात असण्याची शक्यता गृहीत धरून, त्यांनी रात्रभर सीसीटीव्ही कॅमेरा लावला व त्या ठिकाणी अधिकारी लक्ष ठेवून होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मादी  बछड्या जवळ येऊन तीनही पिल्ले घेऊन गेली. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.