क्राईम : पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 ची उल्लेखनीय कामगिरी...

क्राईम : पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 ची उल्लेखनीय कामगिरी...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : तडीपार असलेल्या सराईत आरोपीकडून १ गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतुस हस्तगत करून आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ ने ताब्यात घेऊन अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, ७ नोव्हेंबर २०२४ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे, राजकुमार हनुमंते, रामदास मेरगळ, त्रिनयन बाळसराफ कर्मचारी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सदर पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चाकण येथील आळंदी फाटा येथे आळंदी हद्दीतील तडीपार आरोपी पिस्तुल बाळगून उभा आहे. त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून सदर आरोपीस पंचा समक्ष ताब्यात घेऊन त्यास नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव हरीओम गणेश पांचाळ,(वय २४ वर्ष) राहणार आळंदी, ता.खेड, जि.पुणे असे सांगितले.

सदर आरोपीची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस असा एकूण ५१००० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपी विरुध्द चाकण पोलीस ठाण्यात मम्पोका १४२, आर्म ॲक्ट कलम ३,२५, म.पो.का.कलम ३७ (१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे..

१) भोसरी २२९ /२२ भा.द.वि. कलम ३०७, भा.ह.का. कलम ४,२५, म.पो.का. कलम ३७ (१)(३), सह १३५, क्री. ला. अ‍.अ‍ॅक्ट कलम ३,७

२) दिघी १०९ /२०२३ भा.द.वि. कलम ३०७, भा.ह.का. कलम ४, २५ म.पो.का. कलम ३७ (१)(३), सह १३५, क्री. ला. अ‍.अ‍ॅक्ट कलम ३,७

३) दिघी ३ /२०२३ भा.दं. वि.कलम ३८०, ३४

४) दिघी ३३/२०२३ भा.ह.का. कलम ४,२५

५) आळंदी १५१/२०२२ भा.ह.का. कलम ४,२५, म.पो.का. कलम ३७(१)(३), सह १३५ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. या आरोपीची पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.