दिंडोरी विधानसभेसाठी निवडणूक निरीक्षकांच्या'समोर बॅलेट युनिटची सरमिसळ संपन्न

दिंडोरी विधानसभेसाठी निवडणूक निरीक्षकांच्या'समोर बॅलेट युनिटची सरमिसळ संपन्न

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक  यांच्यासमोर ४४८ बॅलेट युनिट ४४८, कंट्रोल युनिट व ४८५   vvpat चे द्वितीय सरमिसळ पार पडली.

आज दि.७/११/ २४  रोजी दुपारी साडेबारा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभाग अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ पार पडली.१२२ दिंडोरी विधानसभा

सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३७३  मतदान केंद्रासाठी दि.२०  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सहा या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्यासाठी आवश्यक असणारे मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण)  सौरभ कुमार सुमन यांच्या उपस्थित व सर्व उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्यासमोर पार पडले.

प्रथम सरमिसळ जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे . द्वितीय सरमिसळ ई एम एस प्रणालीद्वारे पार पडणार असल्याबाबतची प्राथमिक माहिती उपस्थित सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली. त्यानंतर थोडक्यात द्वितीय सरमिसळ बाबत कार्यपद्धती उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना समजावून सांगण्यात आली व सर्व मतदान यंत्रांचे नंबरचे तीन राऊंड निवडून त्यातील शेवटचा राऊंड सरळसासाठी घेण्यात आला व त्यानुसार सर्व मतदान यंत्र मतदान केंद्रनिहाय सरमिसळ करून त्याची यादी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना दाखवण्यात आली व त्यावर उपस्थित सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या  स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.सदर मतदान यंत्राची जोड्या लावणे (pairing ) बाबतची कार्यवाही व मतदान यंत्रे मतदानासाठी सज्ज करणे बाबतची कार्यवाही दि.११/११/२४  ते १४/११/२४ दरम्यान करण्यात येणार असल्याबाबतची माहिती उपस्थित उमेदवार त्यांचे प्रतिनिधी देण्यात देण्यात आली. 

सदर बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार  मुकेश कांबळे, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पेठ श्रीमती आशा गांगुर्डे उपस्थित होते. 

निवडणूक निरीक्षक यांची मतदान केंद्रास भेट- निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण यांनी आज दुपारी मौजे अवणखेड तालुका दिंडोरी येथील मतदान केंद्रांची पाहणी केली व मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांचा आढावा घेऊन मतदान केंद्रावरील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.