क्रां. वसंतराव नाईक महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन...

क्रां. वसंतराव  नाईक महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी येथील  इंग्रजी  विभागाच्या वतीने  सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय,इगतपुरी येथील प्रा. डॉ. किरण रकीबे होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे हे होते.

ननकार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. किरण रकिबे यांनी सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय,तसेच ते कसे आत्मसात करायचे आणि अशा कौशल्याचा जीवनामध्ये उपयोग करून यशस्वी कसे होता येईल यावर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी संभाषण कौशल्य, वाचन कौशल्य आणि लेखन कौशल्य  या विषयावर प्रकाश टाकला.दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन त्यांनी सॉफ्ट स्किल्सचे महत्व अधोरेखित केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र सांगळे यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांचे दाखले देऊन सॉफ्ट स्किल्स व हार्ड स्किल्स याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली . जीवनात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्सची किती आवश्यकता आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सर्जनशीलता,नाविन्यपूर्णता हे गुण सॉफ्ट स्किल्स सोबत यशस्वितेसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहित साळवे यांनी केले तर आभार प्रा.निरज भाबड यांनी मानले.  कार्यशाळेस प्रा.वैशाली गांगुर्डे उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व  कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.