मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर विजबंदी कमी...
NEWS15 मराठी - बापू चव्हाण
नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जलाल शर्मा यांनी पालखेड व ओझरखेड कालवा परिसरात वीज बंदी लागू करण्याचा आदेश काढला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व संताप व्यक्त करून मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली असता; मंत्री भुजबळ यांनी त्याची दखल घेऊन जिल्हाअधिकारी यांना सूचना केल्या
ओझरखेड व पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या आवर्तनाचे पाणी अनेक शेतकरी अनधिकृतपणे वीज मोटारी लावून उपसा करत असतात. शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाऊन पोहोचत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विजबंदीचे आदेश काढले होते. आता सुधारित आदेशात वीजबंदीचा कालावधी घटवला असून, अनधिकृत वीज मोटारींचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश जारी करत 30 डिसेंबर पर्यंतच कालवा परिसरात वीजबंदी लागू केली आहे. संपूर्ण गावांचा वीज पुरवठा खंडित न करण्याच्या सूचनाही त्यांनी पाटबंधारे व महावितरणाला दिल्या आहेत. सध्या पालखेड व ओझरखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.