पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील मार्गदर्शन व कार्यशाळा मेळावा देहू येथे संपन्न...!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील मार्गदर्शन व कार्यशाळा मेळावा देहू येथे संपन्न...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

देहूगाव : आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा व कार्यशाळा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस पाटलांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात उपयुक्त असे मार्गदर्शन केले. या मेळाव्याला आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील बांधव व भगिनी उपस्थित होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षा तृप्तीताई मांडेकर पाटील, पुणे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मोनिका कचरे पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील प्रमुख उपस्थितीत होते.

या मेळाव्यासाठी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक डॉ. राम पठारे व राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत करंडे पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी तर सर्व उपस्थित यांचे आभार देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी साहेब यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन खेड तालुका अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील तसेच खेड कार्यकारी अध्यक्ष सचिन भोपे व सर्व सहकारी पदाधिकारी यांनी केले होते.