शहीद प्रसाद क्षीरसागर यांचा स्मृतिदिन साजरा...

शहीद प्रसाद क्षीरसागर यांचा स्मृतिदिन साजरा...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

शहीद प्रसाद क्षीरसागर यांचा द्वितीय स्मृतिदिन नगरपंचायत दिंडोरी च्यावतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक दिंडोरी तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष भारत खांदवे यांनी केले.

यावेळी विरमाता मंजुषा क्षीरसागर यांनी पुजा करुन श्रद्धांजली अर्पण केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष दीपक जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण करून नगरपंचायतीच्यावतीने शहीद परिवारास सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी कारगिल युद्धातील शहीद एकनाथ खैरनार सेना मेडल मरणोप्रांत यांच्या वीर पत्नी रेखाताई खैरनार यांना दिंडोरी तालुका माजी सैनिकांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.तसेच खुशिराज आश्रम शाळेत २६  जानेवारी या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन एक ते पाच विद्यार्थ्यांची निवड केली या विद्यार्थ्यांना दिंडोरी शहरातील ज्येष्ठ नागरिक सोमनाथ सोनवणे,बाळासाहेब मुरकुटे, शिवाजीराव जाधव,सुरेश देशमुख,व ज्येष्ठ माजी सैनिक गणपतराव जाधव यांच्या हस्ते सन्मानित केले. जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीच्या श्रीमती देशपांडे व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले.

यावेळी जेष्ठ माजी सैनिक पंडितराव खांदवे,चंद्रभान कळमकर,रामदास कदम,उत्तम बैरागी,उत्तम बुणगे,अमर निरगुडे आदींसह माजी सैनिकांसह जिल्ह्यातून शहीद परिवार तसेच नगरपंचायत नगरसेवक,पदाधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. माजी सैनिक विजय देवरे यांनी सूत्रसंचालन केले. तर रणजीत देशमुख यांनी आभार मानले.