नागरिकांच्या तक्रारीवरून उदगीर शहरात १५ ते २० ऑटो रिक्षावर कारवाई...

नागरिकांच्या तक्रारीवरून उदगीर शहरात १५ ते २० ऑटो रिक्षावर कारवाई...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

लातूर जिल्ह्यातील तालुका उदगीर शहरातील ऑटो चालकांना प्रादेशिक राज्य परिवहन अधिकारी व पोलीस प्रशासनाने ऑटोत साऊंड  बॉक्स बसवू नये अशी वेळोवेळी सूचना ऑटो चालकांना दिली होती, परंतु ऑटो चालकाने प्रशासनाच्या सुचनेकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले, काल ऑटो चालकांवर कार्यवाही करण्यात आली.

उदगीर शहरात ऑटो चालकांवर कार्यवाही करण्यात आली. चालकाने ऑटोत मोठया आवाजात गाणे लावत असल्यामुळे ऑटोत प्रवास करणारे प्रवाशी व एखादा रुग्ण अशा व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत होता, या बाबतीत अनेकदा नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी ही केल्या, ऑटोतील साउंड बॉक्सवर कारवाई करण्याची मागणी केली, मात्र काल सकाळी १० वाजल्यापासून पोलीस प्रशासन व प्रादेशिक राज्य परिवहन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत उदगीर शहरातील १५ ते २० ऑटो रिक्षावर कार्यवाही करीत ऑटोतील साउंड बॉक्स जप्त करण्यात आले, यावेळी पोलीस प्रशासन मधील शिवपुजे,अविनाश फुलारी,पोलीस कॉन्स्टेबल बामणे यांच्या पथकाने ही कारवाई केली यावेळी इतर ऑटोचालक चांगलेच घाबरले होते.त्यामुळे आता ऑटो मध्ये साऊंड न लावणे बंधनकारक आहे जर पुढे आढळून आले तर दंडात्मक कार्यवाही होणार हे निश्चित झाले आहे.त्याबरोरच ट्रॅक्टर वर असलेल्या साऊंड वर कधी कार्यवाही होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.