पैनगंगा नदीत बुडून दाेन बहिणीसह, तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू...
![पैनगंगा नदीत बुडून दाेन बहिणीसह, तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू...](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_6655619793612.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
पैनगंगा नदीत बुडून दाेन बहिणीसह; एकूण तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या तिघीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार; किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर सहलीसाठी मारेगाव येथील एक कुटुंब गेले होते. यावेळी पोहत असताना मारेगाव शिवारात नदीच्या पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाल्याची घटना दि.२७ मे रोजी दुपारी दिडच्या सुमारास घडली. दोन बहिणींचा मृतात समावेश आहे. ममता शेख जावेद वय 21 वर्ष, पायल देविदास कांबळे वय 16 आणि तिची बहीण स्वाती देविदास कांबळे आणि इतर काही जण पोहण्यासाठी गेले होते. नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असतानाच; यातील एक जण बुडू लागली.! तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघीही बुडाल्या आणि यात तिघींचा बुडून मृत्यू झाला.
पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली. तर ह्या घटनेनंतर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.