दिंडोरी पोलिसांचा शेतकऱ्यांकडून सत्कार; शेतकऱ्यांनी केले कौतुक
![दिंडोरी पोलिसांचा शेतकऱ्यांकडून सत्कार; शेतकऱ्यांनी केले कौतुक](https://news15marathi.com/uploads/images/202410/image_750x_6703eeab48d05.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना तुमच्या नावावर कर्ज प्रकरण करून ट्रॅक्टर खरेदी करतो व तुमचा ट्रॅक्टर आमच्या कंपनीत कामाला लावून तुम्हाला दरमहा ट्रॅक्टर भाड्यापोटी पाच हजार रुपये मिळतील व ट्रॅक्टरचे हप्ते आमची कंपनी भरेल असे सांगून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. त्यासंदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तात्काळ दखल घेतल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास आधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख यांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 11 ट्रॅक्टर एकूण 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, पोलीस हवालदार कनोज,पोलीस अंमलदार अविनाश आहेर,विशाल पैठणकर,अनिता ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेतकऱ्यांनी आज सोमवार दि.७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्यात येऊन त्यांचे कौतुक करत पोलीस कर्मचाऱ्यांचे व पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सर्व कर्मचाऱ्यांना पेढे वाटण्यात आले. यावेळी नामदेव गावित,चंदर गायकवाड,कैलास केदारे,साहेबराव शिंगाडे,भगवान बुरंगे,निवृत्ती वायकांडे,चंदर टोंगारे,जयराम शिंगाडे, गोरख बगर,महादु भाये आधी शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण पत्रकार संदीप तिवारी, संदीप गुंजाळ,संतोष विधाते उपस्थित होते.