वारद मेडिकलवर प्रिस्क्रीप्शन शिवाय गुंगीचे औषध विक्री.! पोलिसांच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
गेल्या अनेक दिवसापासून लातूर जिल्ह्यात मेडिकल दुकानदाराचा सावळा गोंधळ माथला असताना; वरद मेडिकलवर गुंगीचे औषध विक्री केल्याचे आढळून आल्यानं.! त्यावर पोलिसांच्या कारवाईने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तसेच अशा मेडिकल चलकांचे धाबे दणाणले आहेत.
सविस्तरवर वृत असे की, लातूर शहरातील जीवितास धोका करणारे गुंगीकारक औषध प्रिस्क्रीप्शन शिवाय विकणाऱ्या वारद मेडिकलवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की.! जुन्या रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये एक इसम कार मध्ये बसून काहीतरी नशा करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून; त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासह जाऊन छापा मारला असता.! एक इसम नशा करीत असता मिळून आला... त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याजवळ गुंगीकारक गोळ्याची १० स्ट्रीप्स, इंजेक्शन सिरींज आदी ताब्यातील नशेचे ११ साहित्य मिळून आले.
सदर इसमास गुंगीकारक औषधाचे प्रिस्क्रीप्शन बाबत विचारणा केली असता; त्यांने प्रिस्क्रीप्शन नसल्याचे सांगून सदरचे गुंगीकारक औषध विना प्रिस्क्रीप्शन शिवाय गेल्या ०३ महिन्यापासून गांधी चौकातील वारद मेडिकल मधून खरेदी करत असल्याचे सांगितले. त्याच्या माहितीनुसार, पोह / महेश पारडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारद मेडिकलचा मालक गांधी चौक लातूर यांच्या विरुद्ध पोस्टे गांधी चौक लातूर येथे गुरनं - ५१६ / २०२५ कलम - १२३ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.