कोयता ठरतोय चाकण औद्योगिक वसाहतीमधील गुन्हेगारीचा पॅटर्न...!

कोयता ठरतोय चाकण औद्योगिक वसाहतीमधील गुन्हेगारीचा पॅटर्न...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सध्या चाकण शहर व परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर कमी वयाचे तरुण सामील असल्याचेही निदर्शनास आले आहे.

आजच्या मितीला झालेल्या गुन्हातील हेच कमी वयाचे तरुण गुन्हेगार पुढील १० ते १२ वर्षांनी जेलमधून शिक्षा भोगून आल्यावर ते यापेक्षाही भयावह कृत्य करायला मागेपुढे बघणार नाहीत. आणि त्याचा मोठा विपरीत परिणाम या चाकण औद्योगिक वसाहतीवर झाल्याशिवाय राहणार नाही. बरेच कमी वयाचे तरुण गुन्हेगारीतील मोठ्या धेंडयांना बघून त्यांच्या स्टाईलचे अनुकरण करण्यासाठी अशी गुन्हेगारी पार्श्वभूमिचे कृत्य करतात आणि आयुष्याच्या उमेदीचे बरीच वर्षे जेल मध्ये काढतात. त्यातून त्यांची भेट ज्याचे आपण अनुकरण करतो किंवा ज्याची आपण स्टाईल अवलंबण्याचा प्रयत्न करतो त्याच्याशी होते. आणि तोच शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेलेला तरुण मोठ्या गुन्ह्याचे धडे गिरवायला सुरुवात करतो. त्यातून पुढे एक ना एक दिवस तो जेल मधून बाहेर येतो आणि भाईकडून शिकलेल्या शिक्षणानुसार बाहेर अनुकरण करण्यास सुरुवात करतो.

असाच काहीसा पॅटर्न चाकण शहर व चाकण औद्योगिक वसाहतीत सुरु आहे. मागील घडलेल्या बऱ्याच गुन्ह्यात कोयता हत्यार आणि गुन्हेगारांचे असणारे कमी वय हे याच परिसराला चिंता निर्माण करणारे ठरले आहे. बऱ्याच गुन्ह्यात गुन्हेगारांनी कोयता हत्याराचा वापर करून काहींना जीवाणीशी संपवले आहे. तर, काहींना दमबाजी, मारहाण करून आपल्या लाईफस्टाईल गरजा भागवल्या आहेत. पण त्यावर आता पर्यंत कुणाला ठोस अशा उपाय योजना करता आल्या नाहीत.

सध्या चाकण शहरात व बाजूच्या परिसरात अशा अल्पवयीन व कमी वयाच्या तरुणाचे गुन्हेगारी क्षेत्रातील जाळे वाढले आहे. असे तरुण एकत्र येऊन चिरीमिरी पैशासाठी किंवा स्वतःची भाई म्हणून वेगळी ओळख निर्माण तयार व्हावी यासाठी मुडदे पाडायला मागेपुढे पाहत नाहीत. अशावेळी पोलीस विभाग ज्यांचा घडलेल्या घटनेशी संबंध असेल त्यांच्यावर कारवाई करतात बाकी प्रकरण शांत होते. पण तरुण असा का वागला? याच्या मुळापर्यंत कुणी जात नाही. त्यातून अशा कमी वयाची तरुणाईची गुन्हेगारी वाढताना दिसते आहे. या गुन्हेगारीचे मुळापासून उच्चाटन व्हायला हवे. त्यासाठी शाळा, विद्यालये, महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या यामधील तरुणाचे समुपदेशन व्हायला हवे. तरुणांना गुन्हेगारीतून कसे आयुष्य उद्धवस्त होते याविषयीची प्रखर भूमिका पोलीस व पालक यांच्या माध्यमातून मांडायला हवी. जे ना करून कमी वयातील तरुण अशा वाईट गोष्टीकडे वळले जाणार नाहीत. घरातील एक तरुण जर अशा चुकीच्या मार्गावर गेला तर त्या तरुणांच्या किती पिढ्या बर्बाद होतात हे त्याचा समजून सांगितले पाहिजे. त्याच बरोबर त्यांच्याकडून होणाऱ्या छोट्या छोट्या गंभीर चुका पालकांनी झाकून न ठेवता त्यावर वेळीच आवर घालायला हवा तेव्हाच तरुण अशा गोष्टी पासून दूर राहतील.

पालकांनी मुलांच्या संगोपणाच्या उभरत्या काळात म्हणजे त्यांच्या वयाच्या १६ ते २२ वर्षेच्या काळात विशेष लक्ष देऊन आपली मूले काय करतात याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. नाहीतर आपण औद्योगिक क्षेत्रात राहत आहोत आपल्याला आर्थिक सुबत्ता आहे तुला शिक्षणाची किंवा काम करण्याची गरज नाही अशा अविर्भावात मुलांना ठेवणे चुकीचे आहे. यातूनच अशा चुकीच्या घटना घडत आहेत. एवढेच नाही तर सध्याची चाकण परिसरातील परिस्थिती बघता चांगल्या कुटुंबातील मुलं यांनी अर्थवट शिक्षण सोडून पानाच्या टपऱ्या धरल्या आहेत, इतर शौकीन नाद लावून घेतले आहेत याला सर्वस्वी जबादार फक्त या परिसरातील बाप आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.

म्हणून सर्व चाकण परिसरातील पालकांना, कुटुंब प्रमुखांना आव्हाण आहे की, तुमचे मुलांवरील दुर्लक्ष तुमच्या मुलाला गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवू शकते, तुमचा मुबलक पैसा तुमच्या मुलांना वाया घालू शकतो असेच भयावह वास्तव सुरु राहिले तर, खून करणारे कमी वयाचे तरुण ऐन जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात जेल मधून बाहेर येतील आणि जे सर्वांच्या उत्पन्नाचे साधन असणाऱ्या औद्योगिक वसाहतीवर आपली दहशद निर्माण करतील. त्यावेळी त्यांना ना स्वतःच्या बापाची ओळख असेल ना स्वतःच्या जीवाची अशाने इतर प्रामाणिक लोकांना जो रोजच्या रोजी रोटीसाठी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून औद्योगिक वसाहतिकडे पाहिले जात आहे ते गुन्हेगारांची वसाहत व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा अशा तरुणांईवर आळा घालणे पोलिसांच्या पुढे एक मोठे आव्हान असेल. याच आयुष्यावर बेतणाऱ्या जिकरी आव्हानाला पोलीस प्रशासन कसा आळा घालतात आणि काय उपाययोजना करतात हेच पहावे लागेल.