राजकीय : खेड-पिंपळगाव तर्फे मरकळ जिल्हा परिषद गटातून जनसेवक श्रीनाथ लांडे यांना शिवसेनेची (धनुष्यबाण) उमेदवारी जाहीर..!

राजकीय : खेड-पिंपळगाव तर्फे मरकळ जिल्हा परिषद गटातून जनसेवक श्रीनाथ लांडे यांना शिवसेनेची (धनुष्यबाण) उमेदवारी जाहीर..!

News15 मराठी (प्रतिनिधी: आशिष ढगे पाटील)

चाकण : ​पिंपळगाव तर्फे खेड - मरकळ जिल्हा परिषद गटातून अखेर जनसेवक म्हणून ओळखले जाणारे श्रीनाथ लांडे यांना शिवसेनेकडून (धनुष्यबाण चिन्ह) अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारीची घोषणा होताच श्रीनाथ लांडे यांनी आज धनुष्यबाणाचे चिन्ह लावून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

मागील काही दिवसांपासून श्रीनाथ लांडे यांची राजकीय भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण गटाचे लक्ष लागून राहिले होते. याच दरम्यान, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आणि शिंदे गटाचे नेते विजय शिंदे यांच्या एका कार्यक्रमातील व्हिडिओने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. या व्हायरल व्हिडिओमध्ये विजय शिंदे यांनी आपल्या गळ्यातील पक्षाचा गमछा काढल्याचे दिसले होते, ज्यामुळे त्यांना मोठा खुलासा करावा लागला आणि पक्षापासून ते दूर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर, News15 मराठीने आपल्या बातमीतून श्रीनाथ लांडे यांना 'धनुष्यबाणा'ची उमेदवारी मिळेल असे संकेत दिले होते, ज्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारी जाहीर होताच, या जिल्हा परिषद गटात श्रीनाथ लांडे यांचा विजय निश्चित झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

कामाच्या बळावर मोठी टक्कर..

श्रीनाथ लांडे यांचा कामाचा झपाटा आणि समाजोपयोगी कामातील सातत्य पाहता, ते विद्यमान सभापती विजय शिंदे यांना मोठी टक्कर देतील यात शंका नाही. तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी एकत्रितपणे लांडे यांच्या पाठीशी ताकतीने उभे राहण्याचा आणि एका सामान्य कुटुंबातील, होतकरू तरुणाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिला आहे.

​श्रीनाथ लांडे मतदारांना विश्वास देत आहेत की, "मी पद नसताना मायबाप जनतेची सेवा केली आहे. आता जर मला पद मिळाले, तर मी या जिल्हा परिषद गटाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही."

​याउलट, विजय शिंदे यांच्यावर बाहेरील उमेदवार असल्याचा आणि केवळ आर्थिक पाठबळावर निवडणुकीला सामोरे जात असल्याची चर्चा जिल्हा परिषद गटात रंगली आहे. मात्र, गटातील महिला भगिनींनी कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी न पडता, फक्त जनसेवक श्रीनाथ लांडे यांनाच, एक कुटुंबातील सदस्य म्हणून निवडून देण्याचा संकल्प केल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया:

​"या संधीचे सोने करून भगवा फडकवणार!" - जनसेवक श्रीनाथ लांडे

​"माझ्यावर पक्षाचे नेते आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना नेते अतुल देशमुख, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, युवा सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख धनंजय पठारे यांनी विश्वास ठेवून ही संधी दिली आहे. या संधीचे मी नक्कीच सोने करून माझ्या जिल्हा परिषद गटातील बंधू-भगिनीच्या आशीर्वादाने या जिल्हा परिषद गटात भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही," असा आत्मविश्वास जनसेवक श्रीनाथ लांडे यांनी व्यक्त केला.