हार्मोनियम वाद्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पंढरीची वारी...

हार्मोनियम वाद्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पंढरीची वारी...

प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक

दिंडोरी तालुक्याचे आमदार हे नेहमी आपल्या आगळे वेगळे व्यक्तिमत्वाने म्हणून ओळखले जातात. त्यामध्ये लग्नाची वरात असो किंवा अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रामीण भागातील बोहडा आदिवासी नृत्य असो याशिवाय विदेश दौरा आणि विशेष म्हणजे आपला पेहेराव व बोलण्याची शैली ह्या बाबी नेहमी लक्षवेधी ठरले आहे. 

विधान भवनातील भाषण नेहमी सर्वच राजकीय नेत्यांना खळखळून हसवणारे असते त्यामुळे नरहरी झिरवाळ हे नेहमी चर्चेत असतात गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पक्षाच्या स्नेहभोजनात हार्मोनियम वाजवला होता हा हार्मोनियम देखील एक चर्चेचा विषय ठरला होता यावरच ते थांबले नाहीत तर चक्क त्यांनी आता पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांना भेटून श्रीक्षेत्र जोपुळ ते पंढरपूर या दिंडीमध्ये सहभागी होऊन हाती पताका घेऊन विठुरायाचा निवृत्तीनाथांचा जयजयकार केला. त्यामुळे आमदार झिरवाळ या दिंडीमध्ये पुन्हा एकदा लक्षवेधी ठरले आहे.