परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात..!
![परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात..!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63b9002ceef9c.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंच आणि परिवर्त बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने.! दिंडोरी येथे एक दिवसीय 'परिवर्त ग्रामीण साहित्य संमेलन होते आहे. रविवार दि. ८ जानेवारी रोजी हे संमेलन संपन्न होणार असून, या संमेलनाची तयारी वेगात सुरू आहे.
या प्रसंगी स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ, संयोजन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ, कार्याध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे आणि प्रमुख कार्यवाह प्रा.गंगाधर अहिरे परिश्रम घेत आहेत. आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. संमेलन परिसराला 'सत्यशोधक कर्मवीर रावसाहेब थोरात नगरी' हे नांव देण्यात आले असून, सभागृहाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड नावाने संबोधले जाणारे आहे.
प्रा.अविनाश डोळस ग्रंथ दालनात ग्रंथ विक्रीच्या स्टॉलची व्यवस्था असून, त्यापैकी एका स्टाॅलवर दिंडोरी तालुक्यातील साहित्यिकांचे साहित्य ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्यातील साहित्यिकांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच भोजन कक्ष, पाहुण्यांची राहाण्याची व्यवस्था, डिजिटल बॅनर आदि व्यवस्था अंतिम टप्प्यात आलीय. संविधान रॅलीत सहभागी होणार्या जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाचा सराव सुरू असून, निमंत्रण पत्रिकांचे वाटपही वेगात सुरू आहे. विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.धिरज झाल्टे, बापू चव्हाण, नितीन बागूल, सचिन वडजे नितीन गांगुर्डे, अशोक निकम संतोष कथार, कवी संविधान गांगुर्डे, मिहिर गजभे, कवी गोकुळ आव्हाड, प्रदीप जाधव, आदि मान्यवर विशेष परिश्रम घेत आहेत.