ST चालकाने मद्यप्राशन करून केला एसटीचा अपघात.! वारकरी थोडक्यात बचावले... काहींना दुखापत...

ST चालकाने मद्यप्राशन करून केला एसटीचा अपघात.! वारकरी थोडक्यात बचावले... काहींना दुखापत...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक वारकरी तसेच विठ्ठल भक्त आपली मनोकामना घेऊन जात असतात.! मात्र वर्धा जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन दि. 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता निघालेल्या एसटी बस क्रमांक MH 14 BT 4676 या बसचा पुसद नजीक मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने सुधाकर नाईक पुतळ्याजवळ एका डिव्हायडरला जबर धडक दिल्याने; अपघात झाल्याने बस मधील 45 वारकऱ्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे.

यात एक वयोवृद्ध आजी आणि एका युवकास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर यामुळे वारकऱ्यांना मधातच अडकावे लागले आहे.

या बसमधील कंडक्टर तसेच ड्रायव्हरने मद्यप्राशन केल्याचे प्रवाशांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर बस मधील कर्मचाऱ्यांची बॅग चेक केली असता; यात देशी तसेच विदेशी दारूचे बंपर आढळून आले. अनेक प्रवाशांनी यासंबंधी तक्रार दिली असताना सुद्धा एसटी प्रशासन तसेच पोलीस प्रशासनामार्फत एक तास कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही माध्यम प्रतिनिधींनी प्रशासनाला संपर्क साधला असता; प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची तात्काळ मदत मिळाली नाही. तर या संबंधित घटनेची वार्ता व्यवस्थापक मंगेश पांडे यांना कळवण्याकरिता भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. अतिशय गंभीर प्रकार घडलेला असताना; व्यवस्थापकाचा हलगर्जीपणा यावेळी दिसून आला.

तर आता; वर्धा बस डेपो मधील चालक तसेच वाहक यांनी मद्य प्राशन करून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे ड्रायव्हर तसेच कंडक्टर यांच्यावर काय कारवाई होते याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे.