अस्वलाचा 60 वर्षीय ईसमावर हल्ला.! अस्वलाच्या हल्ल्यात ईसम गंभीर जखमी...
![अस्वलाचा 60 वर्षीय ईसमावर हल्ला.! अस्वलाच्या हल्ल्यात ईसम गंभीर जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_63918e0c5eeca.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके
गोंदिया : अर्जुनी - मोरगाव तालुक्याच्या अर्जुनी / मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खोळदा वनखंड क्रमांक 1232 संरक्षित वनमध्ये; आस्वलाने एका ईसमावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सदर घटना काल 12 च्या दरम्यान घडली आहे. जखमी झालेला ईसम महागाव येथिल रहिवाशी असून, राजकुमार बळीराम जांभुळकर (वय 60) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार जांभुळकर हे जंगलात स्वयंपाकासाठी जळतण गोळा करण्याकरिता गेले होते. परंतु, जंगलाच्या झुडपात दडून बसलेल्या वन्यप्राणी आस्वलाने राजकुमार जांभुळकर यांच्यावर मागून हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती वनविभाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले. घटनेची चौकशी केली असता; बोळदा येथिल शेतीला जाण्यासाठी वनखंड क्रमांक1232 सरंक्षित वनमधून कच्चा रस्ता आहे. सदर रस्त्यावर एका ठिकाणी रक्त सांडलेले होते. त्याच्या बाजुला आस्वलाचे पाय खुना आढळल्या.! या वरुन सदर हल्ला हा आस्वल या वन्यप्राण्यानी केल्याचे प्रथम दर्शनी दिसुन आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकु मंडल यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहचुन जखमी ईसमावर प्राथमिक उपचार करुन, रुग्णवाहिकेने महागाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु जखम गंभीर असल्याने जखमीला पुढील उपचारा करिता गोंदिया येथे हलविण्यात आले.