एटापल्ली तालुक्यातील सुराजगड लोह खाणीत भीषण अपघातात.! पाच जणांचा मृत्यू...

एटापल्ली तालुक्यातील सुराजगड लोह खाणीत भीषण अपघातात.! पाच जणांचा मृत्यू...

NEWS15 प्रतिनिधी - ईश्वर परसलवार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरजागड  येतील लोह खाणीत काम सुरू असताना; ट्रक पहाडी वरून बोलेरोवर पडल्याने, या अपघातात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाला आहे. या अपघातात नागेपल्ली येतील सोनल रामगिरीवार हा अभियंता या पदावर काम करीत होता तर दोन मजूर हरियाणा राज्यातील असून, त्यांची ओळख झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटनेत दोन मजूर गंभीर जखमी असून, नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन जखमी पैकी कणीलाल तिगा हा एटापल्ली तालुक्यातील गोडेली येतील असून, सदर कर्मचारी हा मेकॅनिकल म्हणून काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अहेरी, एटापल्ली तालुक्यात पोलीस बंदोबस्त लावण्यात आले आहे 

सुरजागड या ठिकाणी लोह खदान झाल्यापासून आज पर्यंत अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. या घटना समंधी अनेक वेळा धरणे आंदोलन करण्यात आले. शासन स्तरावर निवेदने देण्यात आली. परंतु, शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याचे म्हंटले जात आहे. अजून किती लोकांना आपले प्राण गमवावे लागतील आणि किती लोकांचे संसार उगड्यावर पडणार असा संताप एटापल्ली तालुक्यातील जनता प्रश्न करत आहे. तर हा संताप खूप मोठ्या आंदोलनाचे स्वरूप धारण करण्याची हि शक्यता वर्तविण्यात येत आहे.