राजश निवृत्ती आगलावे यांचे निधन....
प्रतिनिधि :- असलम शेख,
टमाटा उत्पादक म्हणून प्रसिद्ध असणारे शेतकरी राजस निवृत्ती आगलावे वय 67 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता स्नान करून गावातील देवदर्शन करून गुराढोरांच्या देखभालीसाठी स्वतःच्या शेतात ते गेले होते तेथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा जागेवर मृत्यू उपचारासाठी घेऊन जाण्याची संधीही मिळाली नाही म्हणून गावामध्ये हळहळ पसरली आहे
त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,2 मुले ,1 मुलगी, 3 भाऊ, 5 बहिणी सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून पंचक्रोशीतील नागरिक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या मूळ गावी कोपदेव हिप्परगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा मनमिळावू स्वभावाने परिचित असल्याने संपूर्ण गाववर शोककळा पसरली होती.