पालखेड बंधारा शाळेत मुख्याध्यापक खैरनार यांचा सत्कार...

पालखेड बंधारा शाळेत मुख्याध्यापक खैरनार यांचा सत्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जि.प. प्राथमीक शाळेत नव्यानेच रुजू झालेले नवनिर्वाचित मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांचा नुकताच शाळेच्यावतीने व शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पीठे, उपाध्यक्ष लहानु वाघ, उपसरपंच बबलू गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, सोसायटीचे चेअरमन नाना गायकवाड, शालेय समिती सदस्य अन्वर सय्यद, धनराज महाले, संदीप पीठे, जयश्री कडाळे आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक खैरनार यांनी सांगितले की, आपण सर्व शिक्षकांना व शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम योजना राबवून, शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करणार करून शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून मुख्याध्यापकांची जागा रिक्त होती. त्यामुळे शिक्षकांना अडचण निर्माण झाली होती. परंतु आता ही अडचण दूर झाल्याचे सांगून, समितीच्यावतीने खैरनार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार संजय सोनवणे यांनी मानले.

याप्रसंगी शिक्षकवृंद गोविंद ढेपले, शिवाजी भोसले, रवींद्र काकुळते, दिलीप झुरडे, प्रशांत उनवणे, प्रदीप सावंत, ज्ञानेश्वर वायाळ, मोरे, भारती भामरे, श्रीमती आवटे आदी उपस्थित होते.