काँग्रेसच्या अनुसूचित जाती दिंडोरी तालुकाअध्यक्षपदी शाम गवारे यांची निवड
![काँग्रेसच्या अनुसूचित जाती दिंडोरी तालुकाअध्यक्षपदी शाम गवारे यांची निवड](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66eeb7948c6ca.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती जमातिची नुकतीच जिल्ह्याची बैठक पार पडली. त्यामध्ये तालुक्याच्या पुढील नियुक्त करण्यात आलेल्या आल्या त्यामध्ये दिंडोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदी श्याम गवारे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल दिंडोरी तालुक्यात नवचैतन्य निर्माण झालेली आहे,त्यांच्या निवडीमुळे पक्षाला मोठी बळकटी मिळाली असून,काँग्रेसच्या अनुसूचित जाती जमातीची मोठी ताकद त्यांच्यामुळे पक्षाला मिळणार आहे,त्यांच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची संपर्क करून पक्ष वाढीचे काम जोमाने होईल,अशी अपेक्षा दिंडोरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाशजी पिंगळ यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात,नाना पटोले,जिल्ह्याचे अध्यक्ष शिरीष कोतवाल,राजारामपानगव्हाणे, ज्ञानेश्वर काळे,संपत काळे,रमेश कहाडोळे,प्रकाश पिंगळ, सुनिल आव्हाड, वाळू जगताप,पंडितराव गायकवाड,नामदेव राऊत, गुलाबतात्या जाधव,दिलीपराव शिंदे,शंकर ठाकूर,शिवाजी पागे,सचिन आव्हाड,मंगेश बोके,मोतीराम तुंगार,दशरथ महाले,बंटी सय्यद,बबलू शेख,पारूबाई डंबाळे,अलकाबाई, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.