सारा सिटी फेज -डी गृहनिर्माण संस्था निवडणुकीत सारा शिव क्रांती पॅनलचा धुव्वा, सारा संघर्ष पॅनलचे निर्विवाद वर्चस्व...!

सारा सिटी फेज -डी गृहनिर्माण संस्था निवडणुकीत सारा शिव क्रांती पॅनलचा धुव्वा, सारा  संघर्ष पॅनलचे निर्विवाद वर्चस्व...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या सारा सिटी फेज "डी" गृहनिर्माण निवडणुकीत सारा शिव क्रांती पॅनलचा सारा संघर्ष पॅनलने धुवा उडवला आहे.

या निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे कायमच सत्तेची चव चाखणाऱ्या सारा शिव क्रांतीच्या पॅनल प्रमुख यांच्यासह कोणत्याही उमेदवाराला साधा ३० चा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे नवख्या सारा संघर्ष पॅनलने राजकारणात मुरबी असणाऱ्या सारा शिव क्रांती पॅनलला आसमान दाखवून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

सारा सिटी फेज "डी" वसाहतीवर मागील बऱ्याच काळा पासून शासन नियुक्त प्रशासक काम पाहत होते. वसाहतीच्या कारभारात काही स्थानिक व्यक्तीचा हस्तक्षेप होत असल्याने आणि कारभारात मोठी अनियमितता दिसून आल्याने वसाहतीच्या सभासदांनी आवाज उठवून त्या वसाहतीवर शासन नियुक्त प्रशासक नेमण्यात आला होता. सारा सिटी फेज "डी" च्या धक्कादायक निकालामुळे बऱ्याच भावी नेत्यांचे भविष्यातील राजकीय मनसूबे उधळ्याचे बोलले जात आहेत. हीच भविष्यातील खराबवाडी गावचा राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल यात काही शंका नाही.

सारा सिटी फेज "डी" साठी निवडून आलेले नवनियुक्त संचालक व पराभूत उमेदवार पुढील प्रमाणे...

विजयी उमेदवार व पडलेली मते...

सर्वसाधारण उमेदवार...

१) ढमढेरे प्रमोद अर्जुन -९५ विजयी 

२) शिंदे जयदीप विष्णू - ९५ विजयी 

३) पडवळ नितीन जिजाभाऊ - ९४ विजयी 

४) अन्सारी खाजा फैज जहांगीर - ९३ विजयी 

५) कोंडे सुनील अशोक - ९३ विजयी 

६) गुंडाळे केम्पन्ना शिवलिंग - ९३ विजयी 

७) चौधरी रणजित कुमार - ९३ विजयी 

८) पाटील भगवान आनंदराव - ९३ विजयी 

९) करजीखेड किरण मल्लिकार्जुन - ९२ विजयी 

१०) वागदरीकर आनंद रमेश - ९२ विजयी 

११) काडनगिरे सचिन शिवाजीराव - ९१ विजयी 

१२) शेटे राहुल परशुराम - ८९ विजयी

पराभूत उमेदवार 

१३) वाघमारे विलास कृष्णा - २६ पराभूत 

१४) पाटील दिपक प्रकाश - २६ पराभूत 

१५) पाटणे विजय बाबुलाल - २७ पराभूत 

१६) कदम बाबुराव अप्पाराव - २४ पराभूत 

१७) जागूष्टे शरद विठोबा - २३ पराभूत 

१८) घाडगे मल्हारी कुंडलिक - २१ पराभूत 

१९) चोडनकर विजय शंकराव - २५  पराभूत 

२०) मोरे राजू एकनाथ - २३ पराभूत 

२१) मुंडास संगमेश चंद्रशेखर - २५ पराभूत 

२२) नारखेडे अमित विलाश - २४ पराभूत 

२३) जाधव मालन गोरखनाथ - २४ पराभूत 

महिला प्रतिनिधी...

१) पंजाबी हर्षा मनोहरलाल - ९९ विजयी 

२) मेटांगे पूनम योगेश - ९९ विजयी 

३) गायकवाड रागिणी राम - २५ पराभूत

४) त्रिभुवन नम्रता दिपक - २७ पराभूत 

इतर मागासवर्गीय प्रवर्ग...

१) पाटील सूर्यभान एकनाथ - १०० विजयी 

२) कड दिनेश कान्हू - २६ पराभूत 

अनुसूचित जाती / जमाती प्रवर्ग...

१) आंबेकर दत्तू किसन - ९९ विजयी

२) करंगे विनोद शिवराम - २७ पराभूत 

भटक्या विमुक्त जाती / जमाती...

१) बोरसे जितेंद्र धोंडू - १०१ विजयी

२) शितोळे सागर सुभाष - २६ पराभूत

विजयी पॅनल प्रमुख म्हणून सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर असणारे प्रमोद अर्जुन ढमढेरे यांनी भूमिका बजावली.त्याच बरोबर विजयी सारा संघर्ष पॅनलसाठी प्रसाद जंगम,वैभव सोनटक्के,सिब्बू तेवर,महिला प्रतिनिधी रेखा लाड यांचे अनमोल सहकार्य लाभले.