दिंडोरी बाजार समिती निवडणुकीच्या निकालाबाबत अपील फेटाळली.! अधिकाऱ्यांचा निकाल कायम...
![दिंडोरी बाजार समिती निवडणुकीच्या निकालाबाबत अपील फेटाळली.! अधिकाऱ्यांचा निकाल कायम...](https://news15marathi.com/uploads/images/202305/image_750x_646879b01a0f9.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
दिंडोरी : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी ३० लाखाची लाच प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या; दिंडोरी बाजार समिती निवडणुकीच्या निकालाबाबत केलेले अपील फेटाळण्यात येऊन निवडणूक निकाल कायम ठेवण्यात आला आहे.
दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली. मात्र या बाजारसमिती निकाल बाबत सोसायटी गटातून शिवाजी पिंगळ व प्रवीण संधान, रघुनाथ मोरे यांनी तर ग्रामपंचायत गटातून वसंत जाधव व नरेंद्र पेनमहाले यांनी मतमोजणीबाबत आक्षेप घेत; फेर मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी निवडणूक आलेल्या संचालक यांच्याशी संपर्क करीत; निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. सदर पथकाने ३० लाखाची लाज घेताना खरे यांना रंगीत पकडले होते. या घटनेनंतर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
खरे यांच्या जागेवर नियुक्ती झालेले जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. वाय.पुरी यांनी सदर प्रकरणी निकाल देत अर्ज फेटाळत निकाल कायम ठेवला आहे. सतीश खरे यांनी ३० लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी पुन्हा न्यायालयात हजर करून, तपासासाठी वाढीव कोठडीची मागणी केली. यावेळी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.शनिवार दिनांक २० रोजी खरे यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक छोट्या मोठ्या अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडण्यात येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये चर्चेला उधाण येत आहे.