प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतोय...

प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतोय...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : भिंती नसलेल्या जगाच्या शाळेत अनुभवाचे पुस्तक वाचता आले पाहिजे असे मत स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केले. त्यांचा मुलगा भाजी विकतोय म्हणजे शेतकरी कुटुंबातील मुलांना व्यवहार ज्ञान मिळाले पाहिजे हा हेतू.

शाहूला सुट्टी आहे. शेतातील शेतावरी आम्ही रोज दादर मार्केटला पाठवतो. परवा शाहू म्हटला पप्पा मी शतावरी पिंपळगाव बाजारात विकून बघतो. तेव्हा क्षणभर हसू आलं.बाजारात कशी भाजी विकणार हा ? थोडेसे नुकसान होईल पण याला अनुभव घेऊ द्या.हा विचार करून मी होकार दिला. पहिल्या दिवशी शतावरी फुलांची १०५ रुपयांची व काल १७०  रुपयांची भाजी त्याने बाजारात विकली.त्याने मिळवलेले हे पैसे ५०  खोक्यांपेक्षा मला निश्चित जास्त वाटले.आज पण बाजारात जायची जोरदार तयारी सुरू आहे.अर्थात मिळालेले सगळे पैसे आम्ही त्यालाच दिले आहे.पुढे ही देणार आहोत.त्या पैशाचे तो काय करतो हे भविष्यात बघु पण तीन तास बाजारात बसण्याचा अनुभव मात्र तो रोज घेतो आहे. ते देखील त्याच्या इच्छेने काही लोक त्याला ओळखतात प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतो याचे काही कौतुक करतात. तर काही कुचक्या भाषेत बोलतात. असं तो मला सांगतो.मी त्याला म्हटलं कौतुकाने हुरळून जायचं नाही.अन् कूचक्या बोलण्याने दुःखी व्हायचं नाही.आपलं काम आपण करायचं अन् करतच रहायचं.