शेतीच्या वादातून महिलेस बेदम मारहाण?

शेतीच्या वादातून महिलेस बेदम मारहाण?

लातूर प्रतिनिधी - देवणी तालुक्यातील आंबेगाव येथील आसमा खाशीम शेख या महिलेस शेतीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे; उलट तिच्यावरच पोलीसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.

आसमा खाशीम शेख ही महीला शेतात सोयाबीन काढण्यास गेली होती. तीच्या नात्यातील कांही मंडळीने तीला बेदम मारहाण करून, बेशुद्ध केले. तेंव्हा मला उदगीर येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. नंतर पोलीसांनी माझ्यावरच गुन्हा दाखल करून माझ्यावर अन्याय केला आहे असे आसमा खाशीम शेख यांनी सांगितले आहे.