आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - आप्पासाहेब शिंदे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - आप्पासाहेब शिंदे

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

भारत निवडणूक आयोगाचे पार पडलेल्या प्रेस कॉन्फरन्स मधील निर्देशानुसार सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतअधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केले.

 विविध राजकीय पक्ष व त्यांचे प्रतिनिधीं यांची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दिंडोरी तथा १२२ दिंडोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ यांच्या कार्यालयात  आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.

बैठकीमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमाबाबत सविस्तर  माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी दिली.

आदर्श आचारसंहितेचे पालन होईल याबाबत योग्य ती दक्षता घेण्याबाबत सूचित केले.शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण या उद्देशासाठी सरकारी जागेत कोणतेही सरकारी कार्यालय आणि कार्यालयाची इमारत ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसराचा समावेश असणार आहे. सर्व शासकीय मालमत्तेच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/पेपर किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील कटआउट,होर्डिंग्ज इत्यादी जाहिरातींची फलके तसेच बॅनरर्स आणि झेंडे निवडणूक जाहीर झाल्यापासून २४ तासांच्या आत काढून टाकण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.सार्वजनिक मालमत्तेची विद्रुपीकरण आणि सार्वजनिक जागेचा गैरवापर यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन,पोस्टर्स,पेपर्स किंवा कटआऊट, होडींग्स,बॅनरर्स,झेंडे इत्यादी आणि सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन,बसस्टँड, विमानतळ, रेल्वेपूल,रस्ते,शासकीय बसेस, इलेक्ट्रीक टेलिफोन खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या इमारती येथील अनधिकृत राजकीय जाहिराती त्याचप्रमाणे खाजगी मालमत्तेची विद्रुपीकरण खाजगी मालमत्तेवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती  काढून टाकण्याबाबत निर्देशित केले आहे.वडणूक खर्च देखरेख आणि आदर्श आचारसंहितेचे अंमलबजावणी याबाबतची कार्यवाही - दारु/ रोकड/प्रतिबंधीत औषधे यांच्या वाहतुक तपासणीकरीता भरारी पथके,स्थायी देखरेख पथके तसेच अवैध औषधे /अंमली पदार्थांच्या अवैद्य वाहतुक तपासणीकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत भरारी पथके तात्काळ कार्यान्वित करण्यात यावीत.आदर्श आचारसंहिते संदर्भात आपल्या भागामधील काही घटना झाल्यास तात्काळ मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क करून निवडणूक कामात सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आलेे.प्रास्ताविक हे सहाय्यक निवडणूक अधिकारी मुकेश कांबळे यांनी केले.आभार निवडणूक निर्णय अधिकारी आशा गांगुर्डे यांनी मानले.