चाकण पोलिसांनी १००० किलो गोमांस घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी पकडली, संगमनेर मधील एक किन्नर व एका व्यक्तीस अटक...!

चाकण पोलिसांनी १००० किलो गोमांस घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी पकडली, संगमनेर मधील एक किन्नर व एका व्यक्तीस अटक...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : शहरातील जय भारत चौक, चाकण, पुणे -नाशिक हायवे वरती कांदा मार्केट जवळ आरोपी १)सिकंदर चाँद शेख (वय -३२ वर्ष, किन्नर) रा. नायकॉडपुरा संगमनेर, जि. अहमदनगर, २) लियाकत अहमद पठाण(वय -५५ वर्ष)धंदा -चालक याने त्याच्या स्कॉर्पिओ गाडी नंबर एम. एच.१२ डी डी ५००० चालक मुजामील शेख रा. संगमनेर यांनी आपसात सगणमंत करून कोणत्यातरी गोवंशीय प्राण्याची कत्तल करून सदर मास संगमनेर येथून मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना त्यांना गाडीसह चाकण पोलिसांनी अटक केली.

आरोपी यांच्या विरोधात ३५/२०२३ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ सुधारित १९९५ चे कलम ५क, ९अ प्रमाणे चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मूजामील शेख रा. संगमनेर याचा चाकण पोलीस शोध घेत आहेत. या बरोबरच या गुन्हात यांना अजूनही काही सहकारी असण्याची शक्यता चाकण पोलीस यांना असल्याचे सांगितले.

या आरोपीच्याकडून सखोल चौकशी अंतीच नक्की हे मास कुठून व कुणाकडून घेतले होते अन ते कुठे चालवले होते हे स्पष्ट होणार आहे.

यावर पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिगांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर करत आहेत.