मोठी बातमी : स्वतःला स्वयंघोषित नेता समजणारा नागेश शिंदेवर खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल..!

मोठी बातमी : स्वतःला स्वयंघोषित नेता समजणारा नागेश शिंदेवर खंडणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : स्वतःला स्वयंघोषित नेता समजनारा आणि शिवभीम संघर्ष फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य नावाने संस्था चालवीनाऱ्या नागेश शिंदे याच्यावर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात खंडणी व विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, १७ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास वराळे गावच्या हद्दीतील श्रेयशा हॉटेलवर जाऊन मी या एरियातील भाई आहे हॉटेल मालकाला तुला हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे बोलून पैशाची मागणी केली. हा भामटा यावरच थाबला नाही तर त्याने हॉटेलमध्ये सफाई काम करणाऱ्या महिलेस तिचा हात पकडून तिला त्याच्या अंगाजवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच फिर्यादी गणेश बाबाजी डुंबरे(वय-३१ वर्षे), व्यवसाय-नोकरीं, रा. हॉटेल श्रेयश वर, वराळे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे यास व हॉटेल कामगार राम तळेकर यांना मारहाण करून दरमहा १० हजार रुपये न दिल्यास हॉटेल कसे चालवतात ते पाहतो असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर फिर्यादीच्या सांगण्यावरून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ३०८(४), ७४, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नागेश शिंदे तालुक्यातील शासकीय कर्मचारी, काही संस्था यांना माहिती अधिकार अर्जाच्या व तुमच्या विरोधात उपोषण करतो असे सांगून पैसे उकळत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अगोदर अधिकारी यांच्याशी जवळीक साधून त्यांच्याच विरोधात षडयंत्र करण्यात हा शिंदे पटाईत असल्याची चर्चा परिसरात चर्चीली जात आहे. विशेष करून पोलीस अधिकारी यांच्या विरोधात अर्ज करून त्यांना मानसिक त्रास देणे यात हा शिंदे पटाईत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा हाच खोटा बुरखा महाळुंगे MIDC पोलिसांनी फाडून काढला आहे. महाळुंगे MIDC पोलिसांनी आरोपी नागेश शिंदे याच्या विरोधात काही कुणाची तक्रार असेल तर निसंकोच महाळुंगे MIDC पोलिसांना कळविण्याचे आव्हान केले आहे.

या घटनेचा तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्रसिंग परदेशीं हे करत आहेत.