धक्कादायक घटना.! अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या...

धक्कादायक घटना.! अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या...

NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे

अनैतिक संबंध किंवा अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारहाण आणि हत्याच्या घटनेत महिल काही दिवसांपासून कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ह्यात महिलांवरील घटना आणि हत्यांचे प्रमाण अधिक आहेत. अशीच पुन्हा: एक निर्दयी घटना समोर आली असून, विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात ही घटना घडली आहे.

एका निर्दयी पतीने अनैतिक संबंधांच्या संशयावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे.

पुणे शहरातील येरवडा परिसरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. तर ह्या जोडप्याचे अवघ्या दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तर त्यांना एक ७ महिन्याची मुलगी देखील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोसले असे आरोपी पतीचे नाव असून, त्याने आपली पत्नी रूपाली भोसले हिचा निर्घृण खून केला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, आशिष हॉटेलमध्ये साफ सफाईचे काम करतो तर रूपाली धुणे-भांडी करून घर चालवत होती. अशिष हा रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्यातून दोघांमध्ये सतत भांडणे होतं असत. दरम्यान शनिवारी रात्री आशिष आणि त्याच्या पत्नीचे जोरदार भांडण झालं. यावेळी आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. तसेच धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार करून तिला जखमी केले. त्यानंतर उपचारासाठी रुपाली भोसले हिला रुग्णालयात नेण्यात आले असता; त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.