BREAKING.! लालपरी पुन्हा थांबणार? कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा...

BREAKING.! लालपरी पुन्हा थांबणार? कर्मचाऱ्यांकडून बेमुदत उपोषणाचा इशारा...

MEWS15 मराठी रिपोर्ट - मुंबई

सर्वसामान्यांना शहरासह गावखेड्यांना जोडणारी लालपरी (एसटी) पुन्हा: एकदा थांबण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने, एसटीची सेवा काहीकाळ थांबू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी आजपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. एसटी कामगारांचे आर्थिक आणि महत्त्वाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. म्हणूनच एसटी कामगार संघटनेकडून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान उदय सामंत यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून मार्ग न निघाल्यास 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषणाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. महागाई भत्ता 42 टक्के करावा, महामंडळाला अर्थसहाय्य करावे, कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्या कामगार संघटनेच्या आहेत.

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवस संप केला होता. राज्य सरकारने मेस्मा लागू केला होता. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगार संघटना पुन्हा: आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचे म्हंटले जात आहे.

महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेच्या काही प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे; १. सन 2018 पासूनची महागाई भत्याची थकबाकी द्या. २. माहे एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021 ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्या. ३. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 42 टक्के महागाई भत्ता थकबाकीसह द्या. ४. माहे एप्रिल 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या. ५. मूळ वेतनात जाहीर केलेल्या रु.5000, रु.4000 आणि रु.2500 रुपयांमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर करा. ६. राप कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांएवढे वेतन मिळण्यासाठी 10 वर्षांसाठी सातवा वेतन आयोग लागू करा. ७. सन 2016-2020 च्या एकतर्फी जाहीर केलेल्या रु.4849/- कोटींमधील शिल्लक रक्कम त्वरीत द्या. ८. गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या. ९. शिस्त आणि अपील कार्यपद्धतीचा भंग करुन देण्यात येणाऱ्या नियम बाह्य शिक्षा रद्द करा. १०. अपहार प्रवण बदल्या रद्द करा. ११. सण अग्रीम रु. 12500/- मूळ वेतनाची अट न लावता द्या यासह विविध मागण्या महाराष्ट्र कामगार एसटी संघटनेने केल्या आहेत.