नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा - पोलीस निरीक्षक दराडे यांचे आव्हान...

नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा - पोलीस निरीक्षक दराडे यांचे आव्हान...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी (शिरूर अनंतपाळ)

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर; शांतता समिती बैठकीचे आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी नागरिकांना व मंडळांच्या पदाधीकाऱ्यांना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन केले आहे.

यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे म्हणाले की,  गणेश उत्सवात डीजेच्या आवाजाची मर्यादा राखत, नियमांचे पालन करून आपल्या आनंदाने इतरांना त्रास होणार नाही. उत्सव काळात वर्गणी बाबत देखील सतर्कता घेणे गरजेचे आहे. या सर्व बाबींची खबरदारी घेत सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा.

यावेळी गणेश उत्सव कमिटीचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते , पोलीस पाटील , पोलीस कर्मचारी , पत्रकार उपस्थित होते.