जरांगे पाटलांनी घेतले श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केली प्रार्थना...

जरांगे पाटलांनी घेतले श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन; मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केली प्रार्थना...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाला 24 डिसेंबर तारखेपर्यंत अल्टिमेट देऊन दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रभर सभा करत असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवार दि.21 रोजी सकाळी 9 वाजता त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रार्थना केली.

यावेळी मराठा कुणबी समाजाचे जे पूर्वज येथे येऊन गेले त्यांचे लेख या नामावलीतून पुरोहितांनी प्रतिनिधी स्वरूपात दाखवले याप्रसंगी  ज्यांच्याकडे नोंदी आहेत असे पुरोहित संघाचे प्रतिनिधी मनोज थेटे, मयूर थेटे, जयदीप शिखरे, निशाद  चांदवडकर, सचिन ढेरंगे उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात तुंगार ट्रस्टच्यावतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. देवस्थानाचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी स्वागत केले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. यामध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.