संस्कृती संवर्धक मंडळ यांच्या सहयोगाने; दिव्यांगांना सन्मानाची वागणूक देणे हीच खरी मदत...

संस्कृती संवर्धक मंडळ यांच्या सहयोगाने;  दिव्यांगांना सन्मानाची वागणूक देणे हीच खरी मदत...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजु कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ : संस्कृती संवर्धक मंडळ यवतमाळ तर्फे स्थानिक सुराणा भवन येथे; भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि आर. ई. सी. फाउंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग शिबिरात शेकडो लाभार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. तसेच अनेकांना जयपूर फूट तर्फे कृत्रिम हात/पाय बसविण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्कृती संवर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय कोषटवार, दीनदयाल संस्थेचे अध्यक्ष मनोज पांडे, महावीर सेवा समितीचे संचालक नारायण व्यास, जिल्हा संघचालक गोविंदराव हातगावकर उपस्थित होते.

प्रास्ताविकात संस्कृती संवर्धक मंडळाचे सदस्य कुलदीप राशतवार यांनी शिबिरांची माहिती दिली. दिव्यांगासाठी अनेक स्तरावर कार्य करणाऱ्या सक्षम संस्थेची परिपूर्ण शिबिर उपयुक्त ठरतील असे सांगून दिव्यांग राजकारण, समाजकारण, खेळ, नोकरी अश्या सर्वच ठिकाणी यशस्वी होत असल्याने; दिव्यांग व्यक्तींनी कोणतेही न्यूनगंड ठेऊ नये असे आवाहन केले. या प्रसंगी अतीथीच्याहस्ते; लहान बालकास कृत्रिम पाय बसवून, त्याना चालवण्यास लावले तर दोन युवकांना तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. या शिबिरात ३०० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींची नोंद करण्यात आली आहे. संचालन स्वप्निल बोमेनवार तर आभार प्रदर्शन डॉ. विवेक अंगाईतकर यांनी केले. प्रकाश पुरोहित, अनिल बोरले, अंकीत नैताम, अमित कुलकर्णी, गणेश आत्राम, मंगेश वारेकर सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी सहकार्य केले.