साक्री येथील एज्युकेशन सोसायटी आणि जीके नांदरे चित्रकला महाविद्यालय यांचा अनोखा उपक्रम...

साक्री येथील एज्युकेशन सोसायटी आणि जीके नांदरे चित्रकला महाविद्यालय यांचा अनोखा उपक्रम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - खंडेराव पवार, धुळे

साक्री तालुका येथे १० सप्टेंबर २०२३ रोजी एज्युकेशन सोसायटी व जीके नांद्रे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने; साक्री येथील बाल आनंद नगरी येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे पुतणे शिल्पकार रवी सुतार हे प्रमुख मार्गदर्शक होते.

त्यांनी स्वतः शाडू माती पासून गणपती मूर्ती कशी तयार करावी याचे प्रशिक्षण; सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दिले. प्रशिक्षणार्थींमध्ये विविध वयोगटातील कलावंतांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त उज्वलाताई बेडसे, प्राचार्य एस. बी. पाटील, शिल्पकार रवी सुतार, रिताताई मोरे, मनीषाताई सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी उज्वलाताई बेडसे व प्राचार्य पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सतीश पेंढारकर व आभार प्रदर्शन प्राचार्य सुधीर कासार यांनी केले. प्रशांत भावसार हेमंत राठोड व चित्रकला महाविद्यालयातील सर्व चित्रकार कलावंतांनी या कार्यशाळेसाठी सहकार्य केले. अनिताताई पराग बेडसे आणि अविनाश भदाणे, मनोज देसले सर, मुन्ना हरळे, पत्रकार जितेंद्र जगदाळे, संघपाल मोरे, हेमंत महाले आदींनी विशेष सहकार्य केले.