पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ कडुन दरोड्यातील आरोपीना अटक, त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश.....!

पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ कडुन दरोड्यातील आरोपीना अटक, त्यांच्याकडून तब्बल १२ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश.....!

News15 मराठीसाठी विश्वनाथ केसवड

चाकण : पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ कडुन तळेगाव दाभाडे येथील भरदिवसा पडलेल्या दरोड्यातील आरोपीना अटक करून त्यांच्याकडून इतर १२ गंभीर गुन्हाची उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत १० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारच्या सुमारास ५ अनोळखी इसमांनी भरदिवसा दरोडा टाकून २४ तोळे सोने व रोख रक्कम व इतर मौल्यवान ऐवज लुटला होता. सदर गुन्हा बाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गु. र. नं.१७/२०२३  भा. द. वि कलम ३९५, ४५२, ३२३, ५०६(२), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५, शस्र अधिनियम ३,२५, ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवसा दरोडा पडल्याने तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिकांच्यामध्ये घबराटीचे व दहशतिचे वातावरण पसरले होते. दरोड्याचा गुन्हा गंभीर असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस पथकांना व हद्दीतील सर्व पोलीस सर्व पोलीस ठाण्याना सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी योग्य सूचना केल्या होत्या.

या गुन्हाच्या संदर्भात गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस हवालदार विठ्ठल सानप व पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना गुन्हामध्ये सहभागी असणारे आरोपी बाबत खात्रीशीर माहिती माहिती मिळाल्याने सदर गुन्हाचा तपास वरिष्ठ अधिकारी यांनी गुन्हे शाखा युनिट ३ कडे वर्ग केला.

दरोड्यातील गुन्हातील आरोपीना पकडण्यासाठी गुन्हे शाखा युनिट ३ कडून सापळा रचून आरोपी १) अमर हरिदास दहातोंडे (वय २० वर्षे )रा. वडाळा ता. नेवासा, जि. अहमदनगर सध्या रा.चिंबळीफाटा, बर्गे वस्ती यशवंत जाधव यांच्या खोलीत २) अनिल गोरखनाथ म्हस्के (वय ३० वर्षे) रा. चिंबळी फाटा, यशवंत जाधव यांच्या खोलीत ३) राजू रवीशंकर यादव (वय ४२ वर्षे ) रा. तळेगाव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ, जि. पुणे मूळ गाव उत्तर प्रदेश ४) सोपान अर्जुन ढवळे (वय २४ वर्षे) सध्या रा. तळेगाव दाभाडे, गणपती चौक, ता. मावळ, जि. पुणे, मूळ रा. बुलढाणा ५) प्रशांत राजू काकडे (वय ३० वर्ष) रा. तळेगाव दाभाडे यांना गुन्हे शाखा युनिट ३ कडून अटक करण्यात आली आहे.

या दरोड्याच्या गुन्हातील राजू शिवशंकर यादव यांच्यावर अलिबाग पोलीस ठाणे गु. र. नं.१८/२०१२ भा. द. वि कलम ३९५,३४, १२० ब, या गुन्ह्यात ८ वर्षे जेलमध्ये राहून मोका गुन्हातून जामीनावर २०२० मध्ये सुटला आहे. तर अनिल म्हस्के हा पनवेल पोलीस ठाणे गु. र. नं.६४/ २०१४ भा. द. वि कलम ३०२, ३४ मधून जामीनावर बाहेर आहे.आरोपींचे  पोलीस रेकॉर्ड बघता आरोपी हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या दरोड्यातील आरोपी राजू यादव सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने ते पैशाची जमवा जमवी करीत असताना तळेगाव परिसरात फिरत असताना त्यांना समजले की, फिर्यादी हे पूर्वी गुटख्याचे व्यापारी होते ते पूर्वी जेलमध्ये असल्याने त्यांच्या घरी भरपूर काळा पैसा दडवून ठेवलेला आहे असे समजल्या नंतर राजू यादव व त्याचे साथीदार अनिल मस्के, अमर दहातोंडे, प्रशांत काकडे, सोपान ढवळे यांनी संगमत कट करून हत्याराची जमवा जमवी करून सदरचा दरोडा टाकल्याचे कबूल केले आहे. तसेच इतर दोन आरोपी अनिल मस्के व अमर दहातोंडे यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील चाकण, आळंदी, दिघी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली, तळेगाव दाभाडे परिसरातील एकूण बारा चैन स्न्यनिंगचे गुन्हे केले असल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपींकडून गुन्ह्यातील १९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

गुन्हे शाखा युनिट ३ कडून दरोड्यातील गुन्हात अटक केलेल्या  एकूण ५ आरोपींकडून एक दरोडा गुन्हा, १२ चैन स्नॅचिंग गुन्हे तसेच गुन्हात वापरलेल्या दोन मोटरसायकल जप्त करून, एक मोटरसायकल चोरी लोणीकंद पोलीस स्टेशनचा गुन्हा उघड झाला आहे. एकूण २ पिस्तुले, २२ जिवंत काडतूसे, एक लाख रुपये रोख रक्कम, ४३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करून एकूण २५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलिस अंमलदार यदु आधारी, सचिन मोरे, ऋषिकेश भोसरे, सागर जैनक, राजकुमार हनुमंत, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सूर्यवंशी, सुधीर दांगट, महेश भालचिंम, विठ्ठल सानप, समीर काळे, निखिल फापाळे, शशिकांत नागरे, रामदास मेरगळ यांनी केली आहे.