मंगला बागुल यांना आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक...

मंगला बागुल यांना आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक...

 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका  मंगला बागुल यांना २८ वी थायलंड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.

 २८ वी थायलंड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप २०२४ दि. २२ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या दरम्यान सेकाॅन नेकहाॅन राजा भट्टा युनिव्हर्सिटी स्टेडियम येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेत मंगला बागुल यांनी  ४०+ वयोगटात धावणे या क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता.त्यात १००m आणि २००m मध्ये कांस्य पदक मिळाले तर इनफाॅरमल मिक्स रिले ४×१००m मध्ये सुवर्ण पदक मिळाले. तसेच यापूर्वी दक्षिण कोरिया येथील इकसन स्टेडियम येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय आशिया पॅसिफिक मास्टर्स गेम्स स्पर्धेत १००m आणि ४००m मध्ये रौप्य पदक मिळाले होते.

मंगला बागुल यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल म.वि.प्र.समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे ,मविप्र संस्था कार्यकारी पदाधिकारी,दिंडोरी-पेठ संचालक प्रवीण नाना जाधव, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण सर्व संचालक,माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ.प्रा.भास्करराव ढोके,सर्व शिक्षणाधिकारी,जनता इंग्लिश स्कूल व ज्यु.काॅलेजचे प्राचार्य रमेश वडजे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.