जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत दिंडोरी जनता ज्यू कॉलेज संघाचे यश

जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेत दिंडोरी जनता ज्यू कॉलेज संघाचे यश

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरीय हँडबॉल खेळात दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दिंडोरीचा १९वर्षाखालील मुलीनी प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.

मराठा हायस्कूल नाशिक येथे सदर स्पर्धा संपन्न झाली. या मुलांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल म.वि.प्र.संस्थेचे सरचिटणीस अँड.नितीनभाऊ ठाकरे, संचालक प्रवीणनाना जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, नितीन जाधव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,अध्यक्ष दत्तात्रय जाधव, प्रा. शरद शेजवळ, उत्तम भरसठ, सविता शिंदे,रावसाहेब उशीर, एस.एम.गावले आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या खेळाडूंना प्रा.वाय.एस.गांगुर्डे,संजय मोगल भास्कर देवरे ,शरद आहेर, भाऊसाहेब रायते या सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.